पंजाब काँग्रेसला स्पष्‍ट बहुमत

0
4

चंडीगड,वृत्तसंस्था दि. 11 – – पंजाबमध्ये सरकार कुणाचे? या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच मिळणार आहे. काँग्रेसने सत्ताधारी अकाली आणि भाजपला मोठा धक्का दिला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे जवळपास सर्वच जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेस, अकाली दल-भाजप आणि आम आदमी पक्षांत झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. यंदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे.
दुसर‍ीकडे, अमृतसर (पूर्व) मधून नवज्योत सिंग सिद्धू आणि आपचे स्टारप्रचारक भगवंत मान यांच्या काट्याची लढत पाहायला मिळाली. याशिवाय सुखबीर सिंग बादल यांच्या जलालाबाद सीटकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
LIVE UPDATE
– पंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या आघाडीच्या दिशेने मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल आघाडीवर
– काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह पिछाडीवर
– मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
– सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात
– पंजाबमधील 117 जागांसाठी मतदान झाले आहे.