छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात 26 जवान शहीद

0
11

सुकमा जिल्ह्यातील घटनाः ३००  नक्षल्यांचे भ्याड कृत्य
रायपूर/सुकमा- छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातून जाणाèया दोरनापाल-जगरगुंडा मार्गावर दीड महिन्याच्या काळात नक्षल्यांनी दुसèयांदा मोठे घातपात घडवून आणले.  यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे २६ जवान शहीद झाले. दोहनापाल नजीकच्या बुर्कापाल कॅम्प मध्ये सकाळी सहाच्या सुमारास ९० जवानांचे एक पथक रोड ओपनिंग करीत गस्तीवर निघाले होते. सर्च ऑपरेशन आटोपून भोजनानंतर बसलेल्या जवानांवर एॅम्बुश लावून दुपारी दीडच्या सुमारास नक्षल्यांनी हा हल्ला चढवत भूसुरुंगानंतर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत शहीद झालेल्या २३ जवानांचे मृतदेह दुपारी तीनपर्यंत पोलिसांनी शोधून काढले. जखमींपैकी दोघांचा रायपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या ८ जवानांपैकी ६ जण अत्यवस्थ आहेत.
सुकमा जिल्ह्यात नवीन तयार करण्यात येणाèया सडकेच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाची नेमणूक केली होती. सुमारे दीड महिन्यापूर्वी नक्षलवाद्यांनी या पथकावर हल्ला केला होता. यात १२ जवान शहीद झाले होते. सोमवारी बुर्कापाल येथे करण्यात आलेला हल्ला हा भेज्जीपासून जवळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुर्कापाल येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कॅम्पमधून सकाळी ६ वाजता ९० जवानांचे पथक गस्तीवर निघाले होते. दुपारी दीड वाजता भोजनानंतर जवान आराम करीत असताना घात लावून बसलेल्या ३०० नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोटानंतर जवानांवर बेधुंद गोळीबार केला. ही चकमक सुमारे दोन तास चालली.
या हल्ल्याची माहिती वरिष्ठांना मिळताच नजीकच्या ३ किमी अंतरावर असलेल्या चिंतागुफा येथून १९० जवानांचे एक पथक आणि १२ किमी अंतरावरील चिंतलनार येथील १०० जवानांचे दुसरे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. या दोन्ही पथकांनी सर्च ऑपरेशन राबवून २३ जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले. जखमींना उपचारासाठी हेलिकाफ्टरच्या साहाय्याने रायपूर येथे पाठविण्यात आले होते. ३ अन्य जखमी जवानांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.
१२ नक्षल्यांचा खात्मा केल्याचा जवानांचा दावा
या हल्ल्यात जखमी झालेला जवान शेख महम्मद याने  बोलताना सांगितले की, अंदाधुंद गोळीबार करणाèया नक्षल्यांना पोलिसांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले. यात सुमारे १२ नक्षली मारल्याचा दावा या जवानाने केला असून नक्षल्यांचे मृतदेह घेऊन बचावलेले नक्षली पसार झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाèयांनी नक्षलीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मारले जाण्याची शक्यता वर्तविली असून अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले.
या हल्ल्यात इंस्पेक्टर रघुवीर सिंह, सब इंस्पेक्टर केके दास, एएसआई- संजय कुमार, रामेश्वरलाल व नरेश कुमार, हेड काँस्टेबल – सुरेंद्र कुमार, बाना राम, एलपी सिंह, नरेश यादव व पद्मनाभन, काँस्टेबल – सौरभ कुमार, अभय मिश्रा, बनमाली राम, एनपी सोनकर, केके पांडेय, विनय चंद्र बर्मन, पी. अलगुपंडी, अभय कुमार, एन. सैंथिल कुमार, एन. थिरूमुरुगन, रंजीत कुमार, आशीष सिंह, मनोज कुमार, अनूप कर्माकर हे सर्व जवान घटनास्थळी तर हेड काँस्टेबल राम मेहर रायपूर येथे उपचारादरम्यान  शहीद झाले.
एएसआई आरपी हेम्ब्रम, राम मेहर, स्वरूप कुमार, मोqहदर सिंह, जितेंद्र कुमार, शेर महम्मद, लट्टू उरांव, सोनवाने ईश्वर सुरेश यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
या हल्ल्यासंबंधाने मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल्यांनी गावकèयांना पुढे करून हा एम्बुश लावला होता. या नक्षल्यांमध्ये महिला नक्षल्यांच्या सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.  या हल्ल्यात नक्षल्यांनी सुमारे १० राउंड लहान राकेटांचा वापर केल्याचा संशय आहे. नक्षल्यांनी जवानांची २४ शस्त्रे पळविल्याचा अंदाज आहे.
या हल्ल्यात नक्षलवाद्यांच्या मिलिटरी दलमचा सहभाग असल्याचे सांगण्यात येते . या दलमचे नेतृत्व हिळमा यांचेकडे आहे. घटना झालेल्या परिसरातील नक्षली कारवायांची जबाबदारी कमांडर पापाराव सांभाळत असल्याचे बोलले जाते. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोबरा पथकाने नक्षल्यांविरोधात शोध मोहीम हाती घेतल्याचे वृत्त आहे.