समाजाची व्याख्या समजली तेच समाजकार्य करतात : केळझरकर

0
140

सुरेश भदाडे

गोंदिया,दि.27 : नाभिक समाजाची व्याख्या तशी सरळ व सोपी आहे. ज्यांना-ज्यांना समाजाची व्याख्या किंवा संघटनेची व्याख्या समजली ते सर्व बंधू-भगिनी समाज कार्य करून समाज संघटना मजबूत करतात. समाजाला वैभव शिखरावर नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्यांना समजली नाही ते स्वत:च्या मुलांमुलीच्या लग्नापर्यंतची वाट बघतात असे विचार महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष पुंडलिकराव केळझरकर यांनी व्यक्त केले.

ते गोंदिया येथे नाभिक समाज संघटना आणि सलून व्यवसाय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेनजी महाराज यांच्या ७१७ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने, सरचिटणीस अरुणराव जमदाळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, उपाध्यक्ष चुळामन लांजेवार, सलून व्यवसाय जिल्हाध्यक्ष वासू भाकरे, सचिव दुलीचंद भाकरे, जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने, तालुकाध्यक्ष लता मेंदूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष पंचफुला प्रतापगडे, आशा प्रतापगडे, कर्मचारी संघटनेच्या निर्मला फुलबांधे, युवाध्यक्ष संजय चन्ने, श्रीवास समाजाचे अध्यक्ष संजय श्रीवास, मारवाडी समाजाचे अध्यक्ष कालोजी वालीया, सेन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश जांगडे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील उमरे, गोंदिया तालुकाध्यक्ष भूमेश मेश्राम, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष रनधीर मेश्राम आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे, संचालन व आभार जिल्हा सचिव सुरेश चन्ने यांनी मानले.यशस्वीतेसाठी सुशील उमरे, प्रदीप लांजेवार, महेश लांजेवार, कैलाश सूर्यवंशी, मनिष उरकुडे, हेमंत कौशल, विक्रम राजुरकर, चुन्नीलाल सूर्यवंशी, दिपक नागपुरे, राधेश्याम लांजेवार, आलोक लांजेवार, विजय चन्ने, चुन्नीलाल मेंदूरकर, विनायक मेश्राम, सोमेश्वर फुलबांधे, आशिष श्रीवास, संजय चौधरी, लोकेश चन्ने, नूतन बारसागडे व इतर समाजबांधवानी सहकार्य केले