रात्रीच्या वादळाने शाळेचे व राईसमिलच छत उडाले

0
16

गोंदिया,दि.30-गोंदिया जिल्हयात काल शनिवारला रात्रीच्यावेळी अचानक सुरु झालेल्या वादळीवार्यामुळे गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे टिनपत्रेच उडाले.तर दुसरीकडे गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथील एका राईसमिलचेही पत्रे उडून नुकसान झाले आहे.रात्रभर आलेल्या हलक्यापावसासह वादळी वार्यामुळे आंब्याच्या पिकाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.तर ग्रामीण भागातील विजपुरवठा रात्री 10 वाजता जो बंद करण्यात आला तर सकाळपर्यंत अनेक भागात सुरुच झालेला नव्हता.सडक अर्जुनी डव्वा ,गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव,दवडीपार,तांडा आदी भागातील विज पुरवठा खंडीत झालेला होता.गोंदिया शहरातही विजेचा लंपडाव सुरु होता. दवनीवाड़ा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु असून नवीन टिनपत्रे लावताना जुन्ह्याच लाकडांचा वापर करीत असल्याचे वादळाने उघड केले आहे.दुरुस्तीच्या नावावर विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे यांनी केला आहे.तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वनकर हे काम पुर्ण व्हायचे आहे असे सांगून बाजू झटकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.