‘माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र’ पुरस्काराने गोंदिया जिल्हा सन्मानित

0
6

गोंदिया,दि.04- संपुर्ण स्वच्छता विभागाच्यावतीने मार्च महिन्यापर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करुन शासनाच्या हागणंदारीमुक्त गाव व जिल्हा या योजनेत यशस्वी कामगिरी बजावल्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात पार पडलेल्या स्वच्छता मेळावा व दरवाजा बंद अभियानाच्या शुभारंभप्रंसगी गौरव करण्यात आला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महानायक अभिताभ बच्चन , केंद्रीय मंत्री नरेंदसिंग तोमर, राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत ‘माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र’ हे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.चंद्रंकात पुलकुंडवार,जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे,विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, संपुर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख व त्यांच्या चमूला गौरविण्यात आले.यावेळी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत, केंद्रिय सचिव परमानंद अय्यर, राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार, वासोचे संचालक डॉ. सतीश उमरीकर, जलस्वराज्यचे प्रमुख राघवन उपस्थित होते.