NDTV चे प्रमोटर प्रणय रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा

0
6

नवी दिल्ली, दि. 5 – वृत्तवाहिनी एनडीटीव्हीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या घरांवर आज सकाळी सीबीआयने छापा टाकले. प्रणय रॉय यांच्यावर निधीमध्ये फेरफार आणि बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. दिल्ली आणि देहराडूनमधील चार ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले. प्रणय रॉय यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचं 48 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे.

सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयचं एक पथक एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या ग्रेटल कैलाश-1 येथील घरी पोहोचली आणि छापा टाकला. सीबीआयने रविवारी उशिरा प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा मारला. प्रणय रॉय यांच्यावर निधीमध्ये फेरफार आणि बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे.