‘अंबुजा सिमेंट फाऊंडेशनने शेतकर्‍यांना जोडले आधुनिक तंत्रज्ञानाशी’

0
12

नागपूर,दि.16 – समाजाचे आपण काही देणे लागतो, या उद्देशाने अंबुजा सिमेंट फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या विकासासाठी कृषी चरितार्थ हा कार्यक्रम फाऊंडेशनने राबविला जातो. या कार्यक्रमात शेतकर्‍यांला शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा उपयोग या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे २१३ गावांमधील २२ हजार शेतकर्‍यांना जोडले असल्याची माहिती एसीएफचे मुख्य पर्ल तिवारी यांनी पत्रपरिषदेत दिली.
याप्रसंगी तिवारी म्हणाल्या, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांपर्यंत अजूनही तंत्रज्ञान पोहोचले नाही आहे. त्यामुळे तो पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो. यामुळे निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान होते. यातच तो कर्जबाजारी होतो. अशा परिस्थितीत शेती कशी करावी आणि त्याने कोणते पीक घ्यावे, याबाबत मार्गदर्शन करणारे फार कमी दिसून येतात. नेमके हेच काम एसीएफ करीत आहे. भारताच्या ग्रामीण समुदायाला सशक्त करण्याचे महत्त्वपूर्ण काम एसीएफ करीत असून यामध्ये शेतकर्‍यांना बहुपीक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसाठी लागणारा खर्च, ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य सेवा, शेतकर्‍यांच्या मालाला थेट व्यापार्‍यांपर्यंत पोहोचविणे, सेंद्रिय कृषी पद्धती आदी बाबतीत मार्गदर्शन दिले जाते. तसेच शेती करताना पशुधन विकासावर देखील शेतकर्‍यांनी लक्ष केंद्रित करावे यासाठी त्यांना सहकार्य केले जाते.
चंद्रपूरमध्ये एसीएफ स्थानिक शेतकर्‍यांना बेटर कॉटन इनिशिएटिव्ह सोबत भागीदारी करण्यासाठी सर्मथन देण्याच्या कार्यक्रमाची ओळख करून देण्यामार्फत आणि कार्यान्वयासोबत यशस्वी झाली. अँग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, नॅशनल बँक फार अँग्रीकल्चर अँण्ड रुरल डेव्हलपमेंट आणि महाराष्ट्र अँग्रीकल्चर कॉपिटिव्हनेस प्रोजेक्ट सोबत सहयोग करून कृती करण्यात देखील संस्थेने यश मिळविले आहे. ग्रामीण भागात पुरुषांसह महिलांनाही सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे फाऊंडेशन करीत असून चंद्रपूर, गडचांदूर या गावांच्या आसपास असणार्‍या खेड्यांमध्ये शेतकर्‍यांना विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था करीत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रंसगी डोडिस राव, अमोल गावंडे, हरिदास ठिपे आदी उपस्थित होते