भरधाव ट्रकने शाळकरी मुलींना चिरडले एकीचा मृत्यु, चार गंभीर जखमी

0
20

अर्जुनी मोरगाव,दि.31- गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगावबांध ते सानगडी मार्गावर मुंगली येथे भरधाव वेगाने जाणार्या दुधाच्या ट्रकने शाळकरी मुलींना चिरडल्याची घटना आज सोमवारला(दि.31) सकाळीच घडली.या अपघातात एकीचा जागेवरच मृत्यु झाला असून चार गंभीर जखमी झाल्या आहेत.ट्रकने भरधाव येत शाळेत जाणाऱ्या मुलाीना मागून धडक दिल्याने धडकेत एका विद्यार्थींनीचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. मृतकामध्ये ९ वर्षीय कल्याणी कडबे हीचा समावेश असून इत्तर चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ११ वषीर्य योगेश कापगते, ९ वर्षीय बादल मेश्राम, ११ वर्षीय हर्षा कापगते तर ११ वर्षीय रोहिणी डोंगरवार यांचा समावेश असून यातील तिघांवर नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच ट्रक चालकाने घटना स्थळावरून पळ काढला असून नागरिकांच्या मदतीने ट्रक चालक मधुकर राऊत याला अटक करण्यात आली आहे. हा ट्रक गोंदिया जिल्हा दूध संघाचा असून ट्रक आणि आरोपी चालकाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मृतकाच्या कुटूंबियांना १० लाखाची मदत देण्यात यावी तर जखमी लोकांचा खर्च दूध संघाने करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मृतक आणि जखमी हे एकाच गावातील असून मुंगली गावात शोककळा पसरली आहे.