निवडणुकीत पॉलिटिकल डिजिटल व सोशल मीडिया खूप प्रभावी माध्यम – सागर परदेशी

0
14

भाईंदर, (शाहरूख मुलानी ) – सध्याच्या काळातील निवडणुकीत पॉलिटिकल डिजिटल व सोशल मीडिया खूप प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन सागर परदेशी यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना केले. एकविसावे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि एकमेकांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडीयाशिवाय दुसरे उत्तम साधन नाही. सोशल मीडिया हे माध्यम खूप प्रभावी माध्यम आहे आणि सदर माध्यमांद्वारे पॉलिटिकल व्यक्तींना प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम सागर मधुकर परदेशी गेली ५ वर्षे अगदी चोखपणे आणि सातत्याने करत आहेत.
सागर परदेशी यांनी महापालिकांच्या निवडणुकांसाठी सोशल मीडिया माध्यम वापरून प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम केलेले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०१५, बदलापूर नगरपरिषद २०१५, मुंबई महानगरपालिका २०१७ आदींचा समावेश होतो. सध्या ते मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०१७ साठी सोशल मीडिया प्रसार माध्यमांचा वापर करून प्रमोशन चे काम करत आहेत. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर परदेशी यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१५ ची पूर्ण सोशल मीडिया हाताळण्याची जबाबदारी पार पाडली होती. त्यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अँप, रेडिओ, यूट्यूब आदी डिजिटल माध्यमांचा समावेश होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सागर परदेशी आणि त्यांची संस्था हाताळत असलेली बहुदा सोशल मीडिया माध्यमे ही देखील फेसबुक आणि ट्विटर माध्यमांवर व्हेरीफाईड आहेत. व्हेरीफाईड म्हणजे सोशल मीडिया माध्यमांद्वारे प्रसिद्ध व्यक्ती तसेच संस्था यांना माध्यमांची ऑफिशिअल मान्यता दिलेली असते. सध्या परदेशी हे शिवसेना पक्षातील मंत्री, आमदार, खासदार, महापौर तसेच शिवसेना नगरसेवकांची सोशल मीडिया माध्यमे हाताळण्याचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेची देखील सोशल मीडिया माध्यमे ते मागील ३ वर्षांपासून हाताळत आहेत. ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रतील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था होती ज्यांचे २०१२ -१३ साली स्वतःचे असे फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब कार्यन्वित केले गेले होते. अशी माहिती सागर परदेशी यांच्या आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली. तसेच ऑनलाइन पोर्टल, कम्युनिटी, टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन यांच्या माध्यमातून लिखित स्वरुपातील मजकूर(टेक्स्ट) आणि ग्राफिक या दोन्ही प्रकारचा संदेश पसरवणे, व्यवस्थापित करणे, संघटित करणे, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पुन्हा-पुन्हा त्याचा वापर करणे म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया हा आज परवलीचा शब्द झाला आहे. ही संकल्पना आज आबालवृद्ध सगळ्यांनाच माहीत झालीय. फक्त माहीतच नाही, तर त्याचा पुरेपूर वापरही आज केला जातो. विविध प्रकारच्या कामांसाठी आज सोशल मीडिया या प्रभावी माध्यमाचा वापर केला जातो. या क्षेत्रात काम करताना प्रमोशन (जाहिरात) आणि मॉनिटरिंग (देखरेख) अशा दोन प्रकारची कामे करावी लागतात. ब्लॉग्ज, फेसबुक, ट्विटर, लिंकेडीन, ऑर्कूट, यूट्यूब, फ्लिकर, स्लाइडशेअर, डिग, डिलिशिअस, विकीपिडीया, स्टंबलअपॉन आणि स्क्विडो आदी प्रभावी सोशल मीडियाची माध्यमे आहेत. असे परदेशी म्हणाले.