आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

0
15

नवी दिल्ली, दि. 31 – आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होण्याची भीती होती. मात्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ देत दिलासा दिला आहे. याआधी सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देत ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली होती. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे नवीन पॅन कार्ड बनवावे लागू शकते. यासोबतच जर तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही.

https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html

विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया जास्त सोपी होण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड क्रमांकांची जोडणी उपयुक्त होणार आहे. पॅनकार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करायला दोन्ही कार्डांवरील नावे सारखी असणे आवश्यक आहे. दोन्ही कार्ड जोडण्यासाठी नागरीकांनी  567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. याशिवाय नागरीकांना ऑनलाईनही आपल्या कागदपत्रांची जोडणी करुन घेता येणार आहे. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवरील लिंकवरुनही हे काम करता येणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आली होती.  पॅननंतर सरकारने आधार कार्डवर कात्री लावली होती. नियमानुसार देशातील नागरिक एकच आधार कार्ड वापरू बनवू शकतो.  आतापर्यंत 111 कोटी भारतीयांनी आधार कार्ड काढले आहे. सरकारी योजनांसाठी आजघडीला आधारचा दहा आकडी यूनिक आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे.

गेल्या काही दिवसांत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला माहित असायला हवे की, आपले आधार कार्ड रद्द झाले नाही ना.

कशी तपासणार आधार कार्डची वैधता ? 
आधार रद्द केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना चुकून स्वतःचे आधारकार्ड रद्द झालेले नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. मात्र टेन्शन घेऊ नका. आधार कार्ड रद्द झाले आहे की नाही? हे अगदी काही वेळेतच तुम्ही ऑनलाइन तपासून पाहू शकता. \
– आधार नंबर अॅक्टिव्ह आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही स्टेप्स. सर्वप्रथम UIDAIच्या संकेतस्थळावर जा. https://uidai.gov.in/ ही आहे लिंक.
– ही लिंक तुम्हाला नव्या पेजवर घेऊन जाईल. ओपन झालेल्या पेजवर आधार कार्ड नंबरची माहिती मागितली जाईल. आधार कार्डनंबर टाका. तुम्ही एक सुरक्षित कोड टाका आणि व्हेरीफायवर क्लिक करा.
– Verify वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. येथे लिहीलेला आधार नंबर ****** Exists. त्यानंतर त्याच्या खाली तुमचे वय आणि तुमचा मोबाईल नंबरची माहिती असेल. हे सर्व तुम्ही लिहिले असेल तर तुमचे आधार कार्ड अधिकृत असेल आणि ते रद्द झालेले नसेल.
– यानंतर ओपन होणा-या पुढील विंडोमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड रद्द केले आहे की केलेले नाही, याची माहिती उपलब्ध होईल.