अमृता फडणवीस यांचा हस्ते फेटरी व केळझर येथे लोकार्पण सोहळा

0
16

नागपूर,दि.02- आमदार आदर्श दत्तकग्राम योजने अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर जिल्ह्यातील फेटरी व केळझर गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हस्ते पार पडला. या वेळी ग्रामस्थांना विकासाच्या कामासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले.कार्यक्रमात १९ निराधार व विधवा महिलांना म्हशींचे वाटप कण्यात आले. यासह बहुउपयोगी वाहन, स्कूल डीजीटलायझेशन, वाटर एटीएम, सार्वजनिक तलाव,जलशुध्दीकरण सयंत्र इत्यादीचे लोकार्पाण करण्यात आले. केळझर येथे जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले आहे. याच्या माध्यमातून गावकाऱ्यांना शुद्ध पाणी अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. यामुळे गावक-यांचे आरोग्य चांगले राहण्यासोबतच आजाराचे प्रमाण कमी होईल. तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावातील कचरा गोळा करण्यासाठी वाहन देण्यात आले आहे. गावक-यांनी  स्वत:चे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.