नाल्यात आढळला बिबट्या मृतावस्थेत

0
9

औरंगाबाद,दि.02 : सोयगाव तालुक्यातील  बनोटीपासुन एक किलोमीटर अंतरावरील बनोटी वनपरिक्षेत्रातील वाडी येथे  आज एका नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ माजली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाडी येथील भपकाऱ्या शिवारातील गट क्रमांक ५३, ५४ मधील नाल्यात पुर्ण वाढ झालेला बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार शनिवारी (दि.२) दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वन विभागाचे अधिकाऱी घटनास्थळी तपास करीत आहेत.