निकाल लागूनही नियुक्ती आदेश ‘गुलदस्त्यात’

0
24

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे भोंगळ कारभार

जाहिरात निघाल्यानंतर एक वर्षांनी परीक्षा

नांदेड (प्रतिनिधी),दि.04- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया मार्फत पदभर्तीची जाहिरात 29 ऑगस्ट 2014 व   13 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था/कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदे भरण्याकरिता विहित अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांकडून  08 सप्टेंबर 2014 ते  30 सप्टेंबर 2014 या कालावधीत अर्ज मागविण्यात आल्याचे भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी सांगितले.
शिल्प निदेशक, गणित निदेशक, चित्रकला निदेशक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सहाय्य भांडरपाल/ भांडार लिपिक, वाहन चालक अशा प्रकारच्या पदांची विभागनिहाय पदभरती करण्यात येणार होते. त्यात नियमित वेतन आणि ठोक मासिक वेतन अशा प्रकारे विभागणीही करण्यात आले होते. मुंबई विभागात नियमित वेतनावर 154 तर ठोक मासिक वेतनावर 91, पुणे विभागात नियमित वेतनावर 59 तर ठोक मासिक वेतनावर 108, नाशिक विभागात नियमित वेतनावर 141 तर ठोक मासिक वेतनावर 96, औरंगाबाद विभागात नियमित वेतनावर 185 तर ठोक मासिक वेतनावर 29, अमरावती विभागात नियमित वेतनावर 79 तर ठोक मासिक वेतनावर 45, नागपूर विभागात नियमित वेतनावर 79 तर ठोक मासिक वेतनावर 61 उर्वरित 21 पदे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ असे एकूण 1146 पदभरतीची जाहिरात काढण्यात आले होते.
जाहिरात निघाल्या एक वर्षानंतर परीक्षा 22 नोव्हेंबर 2015 रोजी राज्यभरात घेण्यात आले. तद्नंतर 01 जानेवारी 2017 रोजी म्हणजेच तब्बल 14 महिन्यांनी निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे भ्रनिसचे डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी सांगितले आहेत.निकाल लागल्यानंतर विभागनिहाय तिनदा शैक्षणिक कागदपत्र पडताळणी करण्यात आले प्रथम कागदपत्र पडताळणी 3 जानेवारी 2017 रोजी औरंगाबाद, द्वितीय कागदपत्र पडताळणी 3 मार्च 2017 रोजी मुंबई, तृतीय कागदपत्र पडताळणी 30 जून रोजी पुणे येथे करण्यात आले. तिनदा कागदपत्र पडताळणी करूनही अद्यापपर्यंत कुणालाही नियुक्ती आदेश दिले नसल्याने संचालनालयाच्या कामाचे व पदभरती बाबतचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचे डॉ. कलमुर्गे यांनी म्हटले आहेत. निवड यादीतील उमेदवारांना 21 जून 2017 रोजी एक सूचना पत्रही जारी केले असून त्यात असे नमूद करण्यात आले की, निवड झालेल्या उमेदवाराने प्रादेशिक कार्यालय अंतर्गत ज्या पदासाठी अर्ज केलेला होता त्या प्रादेशिक कार्यालयाद्वारे त्यांच्या प्रमाणपत्राची अंतिम तपासणी 29 व 30 जून 2017 रोजी संबंधित कार्यालयात करण्यात येणार आहे, प्रमाणपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश संबंधीत सहसंचालक प्रादेशिक कार्यालय यांच्या द्वारे त्याच दिवशी निर्गमित करण्यात येणार असल्याचे पत्र दिले असतानाही नियुक्ती आदेश ‘ गुलदस्त्यात ‘ का? असा प्रश्न उमेद्वारांसमोर उभे आहे. हलगर्जीपणा सोडून सदरील कार्याचा, नियुक्ती आदेशांचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे, प्रतिक्षित उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची मागणी भ्रनिसचे डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे.