सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले

0
8

लखनऊ, दि. 7(वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक रेल्वे अपघात घडला आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये गुरूवारी सकाळी सहा वाजता रेल्वे अपघात झाला. हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरल्याची माहिती मिळते आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र-ओबराच्या जवळ असलेल्या छपराकुंड स्टेशन जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

शक्तिपुंज एक्स्प्रेस हावडावरून जबलपूरला जात असताना ही घटना घडली आहे. रेल्वे रूळ तुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. दरम्यान, शक्तिपुंज एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या सुविधा करून त्यांच्या स्थळी पाठविण्याची व्यवस्था केली जाते आहे. एक महिन्यापेक्षा कमी वेळात एक्स्प्रेसचे डबे रूळावरू घसरण्याची ही चौथी घटना आहे.