प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते भाजपा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

0
20
नरेश तुप्तेवार
नांदेड,दि.11:-   नांदेड वाघाळा निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असुन सुद्धा सुरुवातीलाच विरोधकांना राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना शहरात आनावे लागत आहे.म्हणजे आमची धसकी लागली असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारला भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन सेनेचे आमदार प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.भारतीय जनता पक्षाचा प्रचार प्रमुख प्रताप पाटील असल्यामुळे भाजपात नवचैतन्य निर्माण झाले आहे.कार्यकत्यांना मुत्सदी नेता मिळाल्यामुळे नांदेड शहरात पहिल्यादांच महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता पालट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमदार प्रतापरावांच्या ‘ प्रतापी ‘खेळया जिल्ह्यातील मातपगार नेत्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षाने ठरवून दिलेल्या निकषानुसार उमेदवार ठरविले जातील. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंताना न्याय दिला जाईल परंतु या ऊपरही कोणी नाराज झाले तर त्यांना विविध प्रकारच्या कमेटीवर घेनार असल्याची गाव्ही निष्ठावंत कार्यकत्यांना दिल्या मुळे नवा जुना वाद मिटला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे कार्यकत्यांनी मनामध्ये हेवेदावे न ठेवता पक्षाचे काम सुरू ठेवा तुम्ही नांदेडात कमळ उगवण्यासाठी प्रयत्न करा त्यास खतपाणी आम्ही घालतो.आपणास नांदेड मधली गुत्तेदारी मोडीत काढायची आहे.मित्रांनो भाजपाने लातूर पर्यंत सत्ता हस्तगत केली आहे. आता नांदेड मध्ये होनार आसल्याने विरधकांची भंबेरी ऊडाली आहे.पक्ष कार्यालयाचे औपचारिक उदघाटन बाकी आहे. साध्या माझ्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमात येवढी गर्दी पाहून पक्षाचे स्थानिक नेते भारावून गेले होते.
आमदार प्रताप पाटील यांनी नाव न घेता नांदेड मधील आमदार खासदारांचा भरपूर समाचार घेतला.जनता तुम्ही कोणत्या पक्षाचे आहोत की कोणत्या पक्षात गेलात याच त्यांना काही घेनदेन नाही.तुम्ही फक्त काम करीत चला जनता तुमच्या सोबत असते. याचे उदाहरण स्वतःत्यांनी दिले आहे.सेनेच्या आमदारांना नाव न घेता चांगला टोला हानला .कार्यक्रमास महानगरअध्यक्ष संतुकराव हंबर्डे, डॉ.धनाजीराव देशमुख, दिलीप कंदकुते, भगवानराव आलेगावकर,प्रविण साले, सुधाकर पांढरे, रामराव केन्दै,संतोष वर्मा, दिलीप ठाकूर, विजय गंभीरे,बिसेन यादव, जनाद्न ठाकूर,मरीबा कांबळे, दिलीपसिंह सोडी,डॉ.शितल भालके, मोतीराम पाटील, प्रताप पावडे, आरती पुरंदरे. सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.