इंधन दरवाढीच्या विरोधात शेगावात काँग्रेसची सायकल रॅली

0
9

बुलढाणा, दि. 22 : : इंधन दर वाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरले आहे. शेगावात पक्ष निरीक्षक साजिद खान पठाण आणि पक्ष नेते रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात शहरातून आज (शुक्रवार) सायकल रॅली काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. इंधनाची दर तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेगाव येथील विश्राम भावनापासून शेगाव शहर आणि तालुका काँग्रेसच्या वतीने सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. पक्ष निरीक्षक साजिद खान पठाण आणि पक्ष नेते रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रैलीत शहर व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी रॅली नंतर तहसीलदार गणेश पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात क्रुड ऑईलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत असताना केंद्र आणि राज्य सरकार अवाजवी कर लावून सामान्य जनतेस लुटत आहेत. गेल्या काही महिन्यापासून इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

गेल्या दोन महिन्यात १६ रुपयांपेक्षा जास्त किमंतीने इंधन दरात वाढ झालेली आहे. एक्साईज ड्युटी २१ रुपये, दुष्काळ कर ११ रुपये, व्हॅट १६ रुपये या किंमती ८० रुपयापर्यंत का नेल्या आहेत? असा सवाल करण्यात आला. त्याच प्रमाणे राज्य सरकार २७ रुपये, केंद्र सरकार २२ रुपये प्रतिलिटर जनतेकडून उकळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.यावेळी जेष्ठ नेते दयारामभाऊ वानखडे, शहर अध्यक्ष केशव हिंगणे, तालुका अध्यक्ष अशोक हिंगणे, नगर सेवक शिवाजी बुरुंगले, नईम सेठ, फिरोज खान, आबिद शाह, संदीप काळे, अमित जाधव, विजय वानखडे, मो. इरफान गु.दस्तगीर, शेख ताहेर, सय्यद नासीर, मो. इमरान, अमीन खा, शेख सईद, या.राजीव जामदार, सय्यद  मन्सूर, मुंतु पठाण, शारीख शाह, राजीव शाह, शिवाजी थोरात आदींची उपस्थिती होती.