मध्य प्रदेशात काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या

0
10

भोपाळ, दि. 25 – मध्य प्रदेशात सध्या पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या दरम्यान दातिया जिल्ह्यातील रुहेरा गावातील एका काँग्रेस नेत्याही गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्या काँग्रेस नेत्याचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. डीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सत्यम गुर्जर यांच्या माहितीनुसार, पंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत रुहेरा गावातील काँग्रेस नेते कैलास उर्फ अनिरुद्ध सिंह यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या राजकीय विरोधकांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे.
या गोळीबारात काँग्रेस नेत्याचे पुत्र कुलदीप सिंह सुद्धा गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्याला उपचारासाठी ग्वाल्हेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकऱणात रुहेरा गावातील सरपंच जनकसिंह व त्याच्या 11 साथीदारांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा तपास सुरू आहे. मृत्युमुखी पडलेले कैलास सिंह हे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष होते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या हत्येचे प्रमाण वाढत आहे.