गडचिरोलीतील अंतरराज्य समन्वय सभागृहाचे उदघाटन

0
8

गडचिरोली ,दि.२८:- पोलीस विश्राम गृह गडचिरोली परिसरात बाधण्यात आलेल्या अंतरराज्य समन्वय सभागृहाचे उद्घाटन राज्याचे गृह राज्य मंत्री ग्रामीण तसेच वित्त व नियोजन दिपक केसरकर यांच्या हस्ते झाले. या सभागृहाच्या माध्यामातून लगतच्या तेलगांना आणि छत्तीसगड राज्यातील चार जिल्हे तसेच नजीकच्या चंद्रपूर, गोदिया या जिल्यातील अधिकाऱ्यांना संपर्क व समन्वय राखणे शक्य होणार आहे.
उत्तम व्यवस्था असणाऱ्या या वातानुकूलीत सभागृहातून या सर्व जिल्हयातील अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कनकरत्नम, गडचिरोलीचे पोलीस महानिरिक्षक अंकूश शिदे, सीआरपीएफ चे उपमहानिरीक्षक टी.शेखर जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमूख, गोदियाचे पोलीस अधिक्षक दिलीप भूजबळ, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहाय्य्क जिल्हा अधिकारी विपीन ईटनकर आदीची उपस्थिती होती.
पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, सीआरपीएफ चे १९२ बटालियन चे कमांडंन्ट के. एस. खुराणा आदीची देखील या प्रसंगी उपस्थिती होती.
या समन्वय सभागृहाचे आरेखण व अंतर्गत सजावटीचे काम श्वेता बालाजी यांनी केलेली आहे. येथे अधिकाऱ्यांना वाय फाय सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आज केसरकर यांचे हेलीकॉप्टर द्वारे आगमन झाले.त्यावेळी हेलीपॅडवर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विश्राम गृहात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला.