रिलायन्स व बँकेविरुद्ध गुन्हा;आमदारांची शेतक-यांसह बॅकेत धडक

0
11

वर्धा दि.२८ :  विम्याचे हप्ते भरूनही शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे आमदारांसह शेतकºयांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपबिती सांगितली. यावर झालेल्या चर्चेअंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पंजाब नॅशनल बँक आणि विमा उतरविणारी रिलायन्स कंपनीवर शेतक-यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सावंगी पोलीस ठाणेदाराला दिल्या. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

तत्पूर्वी शेतक-यांनी वर्धेचे आ. डॉ. पंकज भोयर यांच्यासह पंजाब नॅशनल बँक गाठली. येथे आमदारांनी बँकेचे व्यवस्थापक नेहरू यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी बघतो आणि करतो असेच उत्तर दिले. यावेळी धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी काशिनाथ श्यामराव राऊत व चंद्रशेखर जगताप यांनी त्यांना निर्माण झालेल्या समस्येचे गा-हाणे मांडले.  शेतक-यांनीच बँक व्यवस्थापकांना विमा उतरविणाºया रिलायन्स या कंपनीच्या संबधीत अधिकाºयांचे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी बँक व्यवस्थापक नेहरू यांनी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार नेहमीचाच असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतक-यांच्यावतीने विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिली. बँकेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी शेतकर्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.