महागाईविरोधात गोंदिया युवक काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

0
15

गोंदिया,दि.29– संपूर्ण देशात महागाईमध्ये होणाèया वाढीच्या विरोधात आज गोंदिया शहर युवक काँग्रेसतर्फे बैल्गाडी मोर्चा काढून विरोध प्रदर्शन करण्यात आले. गोंदिया शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नफिस सिद्धीकी यांच्या नेतृत्वात आयोजित मोर्चाला शहीद काँग्रेस भोला भवनातून सुरवात होवून शहराच्या प्रमुख मार्गाने भ्रमण करून मोर्चा भोला भवनात पोहचून मोर्चाचे सभेत परिवर्तन झाले. यावेळी आ. गोपालदास अग्रवाल यांनी मार्गदर्शन करतांना संपूर्ण देशात अराजकतेचे वातावरण असून शेतकèयांना त्यांच्या मालाचे योग्य भाव मिळत नसून शेतकèयांचे आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती महागाई तसेच सरकारच्या व्यापारीविरोधी धोरणामुळे तो दिवस दूर नाही जेव्हा व्यापारीदेखील आत्महत्या करण्यास विवश होईल. वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. सरकारने सर्वांधिक पेट्रोल,डिझेलच्या qकमती वाढविल्या असून विस्कळीत अर्थव्यवस्था, बेरोजगारी तसेच धर्माच्या नावावर विविध जातीच्या लोकांना आपसात लढविणे भाजप सरकारचा मुख्य एजेंडा आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सरकारच्या धोरणाचे उघडपणे विरोध करीत असल्याची टिका केली.

यावेळी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष अशोक चौधरी, प्रङ्कुल अग्रवाल, कॉग्रेस पक्षनेता शकील मंसूरी, नगरसेवक सुनिल तिवारी, भागवत मेश्राम, अपूर्व अग्रवाल, सुशिल रहांगडाले, देवा रूसे, जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष संदिप रहांगडाले, आलोक मोहंती, राजु लिमये, मनोज पटनायक, अङ्कजल शेख उङ्र्क छुन्नुभाऊ, बलजितqसग बग्गा, जुबेर खान, संतोष डोंगरे, प्रशांत उके, बिट्टू खान, सन्नी पटवा, आशिष चौरे, विजय पटले, यासीन शेख, शहजाद खान, खलील पठान, नितीन बघेले, न्निकी बघेले, आदित्य चौव्हान, आकाश ठाकूर, बब्बी खतवार, आशिष मेंढे, मोंटी खान, अप्पू कोरे, सुरेश यादव, कैलाश यादव, मोनू खान, रितेश वंजारी, किशन भगत, प्रविण पटवा, प्रशांत डोंगरे, अवी कोसरकर, जीतू क्षीरसागर, राजेश शिवणकर, गुड्डू शिवणकर, गुड्डू बिसेन, सुरेश पटले, रूपलाल कोरे, पप्पू मामा, आशिष डोकोरेशन, प्रतीक मेंढेसह मोठया संख्येने युवक काँग्रेस व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.