मुख्य बातम्या:
शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना# #धानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक-ना.गिरीश बापट# #सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे- ना.गिरीश बापट# #पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर# #पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी# #टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले# #आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत - सर्पदंश प्रकरण# #गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात १५ दिवसात समिती निर्णय घेणार - पालकमंत्री# #धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट# #शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत 'जवाब मांगो आंदोलन'

अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता व जनजागृती मोहीम

आलापल्ली दि.30(सुचित जम्बोजवार) : अहेरी शहर स्वच्छतेचा ध्यास नगर पंचायतीने घेतला असून  रविवार सुट्टीच्या दिवशीही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. केवळ बोलून दाखवणार नाही तर प्रत्यक्षात करून दाखवणार असे आव्हानच मुख्याध्याकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांनी केले आहे.
राजनगरीत १५ सप्टेंबर पासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून अहेरी शहराच्या प्रत्येक मोहल्यात, प्रत्येक चौका – चौकात जनतेला स्वच्छता मोहीम अभियाना अंतर्गत सामाजिकरित्या जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या चोहीकडच्या बाजूने गंदगीने वेढा घातलेला असल्याने नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार आणि डॉ. कुलभूषण रामटेके यांनी सुट्टीच्या दिवशी आंनद न घेता उपजिल्हा रुग्णालयात स्वछता मोहीम राबविली . यावेळी अहेरी चा रुग्णालयाचा रास्ता ते राजवाडा रोड आणि दानशूर ते आझाद चौकापर्यंत स्वच्छता करण्यात आली आहे. या वेळी नगरसेवक अमोल मुक्कावार आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश जम्पलवार आणि नगर पंचायत चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share