धडक सिंचन विहीर योजना शेतकèयांसाठी वरदान

0
120
गोंदिया,दि.११ :- सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य सरकारने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी अकरा हजार धडक सिंचन विहीर योजनेची सुरवात केली. या योजनेची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यात उत्तमरीत्या करण्यात जि.प.च्या लघुपाटबंधारे विभागाला यश आले. या विहीरींमुळे शेतकèयांना सिंचनाची सोय झाल्याने ही योजना शेतकèयांसाठी खèया अर्थाने वरदान ठरली आहे.
 सिंचनासाठी पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी ११ हजार धडक सिंचन विहीर कार्यक्रमाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने प्रसंशनीय कार्य सुद्धा केले. गोंदिया उपविभागातील घिवारी येथील चौधरी  व हनवते या शेतकèयांच्या शेतात तयार करण्यात आलेल्या विहिरीला लागलेल्या पाण्यामुळे यावर्षी पिकाला पाणी मिळाले आहे.
या पाण्यामुळे न पिकणाèया शेतातून उत्पादन मिळाले असून अंदाजे साडेचार लाख रुपयाचे धान अपेक्षित असल्याचे दोन्ही शेतकèयांचे म्हणणे आहे.गोंदिया जिल्ह्यात या मोहिमेंतर्गंत २००० विहिरींचे लक्ष्य दिले असून गोंदिया तालुक्यात २०० qसचन विहिरीचे लक्षांक होते.या सर्व विहिरींचे बांधकाम लघु पाटबंधारे विभागाने हाती घेतले असून प्रगतिपथावर दिसून येतात.यावर्षी आधीच कमी पडलेला पाऊस त्यात न लागलेल्या शेतीमुळे उत्पादन घटले आहे.अशा परिस्थितीत qसचन विहिरीमुळे या शेतकèयांना मात्र लाभ मिळाला आहे.हनवते यांच्या शेतातील विहिरीला पाण्याचे चांगले झरे लागल्याने आजही विहीर तुडुंब भरलेली आहे.त्याचप्रमाणे चौधरी यांच्या शेतातील विहिरीलाही चांगले पाणी लागल्याने त्यांची शेतातील हलक्या धानाचे पीक हाती आले आहे.
या सिंचन विहिरीमुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळाल्याचे दोन्ही शेतकèयांनी त्यांच्या शेताची पाहणी केली असता सांगितले.लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.आर.चौधरी,सहायक अभियंता वाय.एच.चौधरी यांनी सदर सिंचन विहिरीचे बांधकाम पैशामुळे कुठे अडू नये याची दखल घेत वेळोवेळी टप्याटप्याने विहिरीची संपूर्ण रक्कम संबंधित शेतकèयांच्या खात्यावर जमा करून बांधकाम मुदतीच्या आत पूर्ण करून त्या सिंचन विहिरीचा लाभ खरीप हंगामात  मिळेल  यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते.घिवारीचे सरपंच कटरे,जिल्हा परिषद सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही लपा विभागाच्या या यशस्वी प्रयोगाबद्दल अभिनंदन केले असून कृषी विभागाने या शेतकèयांना कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती दिली आहे.
हनवते  यांच्या १९ एकर शेतीला व चौधरींच्या ८ एकड शेतीला या धडक qसचन विहिर योजनेतील विहिरीमुळे लाभ मिळाला आहे. या विहिरींच्या बांधकामासाठी वेळोवेळी अभियंत्यांनी भेट देऊन गुणवत्तेवर लक्ष ठेवल्याचे शेतकèयांचे म्हणने आहे. या विहिरीमुळेच या वर्षी उत्पादन होऊ शकल्याचे समाधान व्यव्त केले.