राजस्थानात “ओबीसी’ कोट्यामध्ये पाच टक्के वाढ

0
8

जयपूर,दि.27 – इतर मागासवर्गीय वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाचा कोटा 21 टक्‍क्‍यांवरून 26 टक्‍क्‍यांवर नेण्याची तरतूद असलेले विधेयक राजस्थानच्या विधानसभेत आज मंजूर करण्यात आले. यामुळे ओबीसी समाजातील पाच सर्वाधिक मागास असलेल्या गुज्जर आणि इतर चार समुदायांना पाच टक्के आरक्षण मिळाले आहे. या समुदायांचा समावेश पूर्वी विशेष मागासवर्गीय वर्गात केला जात होता.ओबीसी कोट्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के अधिक आरक्षणाची मागणी करणारे हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आले होते. गुज्जर समुदायाने आरक्षणासाठी केलेल्या मोठ्या आंदोलनानंतर हे विधेयक मांडण्यात आले होते.