महात्मा फुले हेच खरे शिक्षक त्यांचा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार

0
22
सांगली,दि.29ः- विश्वरत्न सामाजिक  बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत 26 नोव्हेंबरला  68 वा भारतीय संविधान गौरव दिन व महात्मा फुले स्मृती दिन या निमित्त  समाज गौरव व आदर्श शिक्षकरत्न  पुरस्कार  वितरण सोहळा व व्याख्यान साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे पार पडला.यावेळी संविधान प्रास्तविकचे वाचन घेण्यात आले व 26/11च्या शहिदाना श्रध्दांजली वाहण्यात आली.कार्यक्रमात बोलतांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष शामराव जंवजांळ यांनी महात्मा फुले हे खरे शिक्षक असून त्यांचा स्मृती दिन हा शिक्षक दिन साजरा करण्यासाठी शासन स्तरावर पाठपूरावा करण्याची ग्वाही दिली.
यावेळी विक्रम दादा सावंत जि.प सदस्य,सरदार पाटील जि.प.सदस्य,बी.एन.जगधने गटशिक्षणाधिकारी मिरज, प्रभाकर सनमडीकर ,मनोहर पवार,के.डी.मुल्ला, सौ.वंदना काटे आदी मान्यवरांचे हस्ते समाज भूषण पुरस्कार प्राप्त  प्रविण खरात,डॉ .मनोज बनसोडे,आमसिध्द सोलनकर,संभाजी चंदनशिवे,सौ.सलिमाताई मुल्ला,यु.टी.जाधव,अशोक बनसोडे,सौ.स्नेहल दोंदे,देवराव मनवर,परशुराम शिंदे,ज्ञानेश्वर कोळी,नारायण पवार,मच्छिद् कांबळे ,रेवणसिध्द होनमोरे,आशिष रंगारी,तुकाराम नाईक ,धानाप्पा बाजी ,मंगलनाथ शिंदे,किशोर कांबळे ,सुनिल सुर्यवंशी,शामलाल राठोड,दिलीप वाघमारे इत्यादी शिक्षकांना महात्मा फुले आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार  देवून गौरवण्यात आले.
यावेळी संतोष काटे, प्रल्हाद हुवाळे,संतोष कदम,मल्लेशप्पा कांबळे,संदीप कांबळे,विशाल खाडे,महादेव तंगोळी,बाबासाहेब काटे,पी  एस.ऐवळे, अंकूश कांबळे सर,बहुसंख्येने शिक्षक व  नागरिक उपस्थित होते. विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माडग्याळ या संस्थेमार्फत  सत्कार व आभार संस्थेचे अध्यक्षा सौ.वंदना काटे,उपाध्यक्ष एल. एस.कांबळे, सचिव :एस.पी काटे,सुनील तोरणे यांनी  केले आहे. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले.वकार्यक्रमाचे प्रास्तविक सौ.वंदना काटे यांनी केले. सुञसंचलन दिलीप वाघमारे तर  सुनिल सुर्यवंशी आभार मानले.