अयोध्या वाद : पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला

0
4

नवी दिल्ली –सुमारे 164 वर्षे जुन्या अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. यावेळी सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील असलेले कपिल सिब्बल म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी जेव्हा केव्हा होईल, तेव्हा याचे तीव्र पडसाद कोर्टाबाहेर उमटतील. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी माझी कोर्टाला विनंती आहे की, या प्रकरणावर जुलै 2019 (सार्वत्रिक निवडणुका) नंतर सुनावणी व्हावी. या खटल्यावर अलहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर 7 वर्षांनी सुनावणी होत आहे. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.
सुनावणी सुरू होताच, कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटले की, दस्तऐवज अपूर्ण आहेत. सर्व याचिकाही पूर्ण नाहीत. उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल (एएसजी) तुषार मेहता यांनी सिब्बल यांचा युक्तीवाद मोडीत काढली. संबंधित सर्व कागदपत्रांच्या कॉपीज आणि भाषांतर केलेल्या कॉपीज रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहेत.बुधवारी वादग्रस्त इमारत पाडण्याच्या घटनेलाही 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरुवात झाली. सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल आणि राजीव धवन आहेत तर रामलला पक्षाची बाजू हरीश साळवे मांडत आहेत.