शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

0
12

अर्जासाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 5 :  राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी आता 9 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करता येणार असून सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या सर्व ॲटॅचमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक
प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 14 डिसेंबर 2017 पूर्वी सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.