बिलोली येथे विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0
9

नांदेड ( सय्यद  रियाज ) दि.६़-   बिलोली येथे राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 वा महापरिनिर्वाण दिन सार्वजनिक भीम जयंती महोत्सव,सभापती निवासस्थान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,देशमुख नगर येथे डॉ.बाबासाहेबांच्या पावन स्म्रुतीला अभिवादन केले.बिलोली तहसील समोरील भीमगायनाचा कार्यक्रम हे मुख्य आकर्षण ठरले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बिलोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकभगवान धबडगे,नायब तहसीलदार ओमप्रकाश गौन्ड,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,यशवंत गादगे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतीमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी नगरसेवक प्रकाश पोवाडे,महेंद्रभाऊ गायकवाड, आजमद चाऊस,जावेद कुरेशी,लक्ष्मण शेट्टीवार,समाधान जाधव, राजेंद्र कांबळे, प्रा.मारोती भदरगे,संदेश जाधव, गौतम भालेराव, संविधान दुगाने ,भास्कर भेदेकर,बौद्धाचार्य गोवलवार सर,चंद्रकांत वाघमारे,वैद्यकीय अधिकारी डॉ.कदम,प्रदीप गायकवाड,विठल धोतरे,धम्मपाल जाधव,पंढरीनाथ गायकवाड,जि.टी काळेवार,सुनिल कदम, संजय पोवाडे,रत्नाकर जाधव,माधव एडके,   सय्यद रियाज , यादव लोकडे, देविदास कोंडलाडे,मारोती श्रीगीरे, कमलाकर जमदाडे,सिद्धपा पाटील,दिलीप घाटे, सुनिल जेठे ,मुन्ना पोवाडे, डी.टी सूर्यवंशी,पंढरीनाथ गायकवाड,संदीप कठारे,गजानन पांचाळ,रवि गायकवाड,व शेकडो बौद्ध उपासक व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.