बोगस रस्ता कामांच्या विरोधात देगलुर मध्ये आमरण उपोषण

0
10

नांदेड( सय्यद रियाज ) दि.६़.:-  बिलोली तालुक्यातील आदमपुर कमान ते पोखर्णी फाट्यादरम्यान केंद्रीय मार्ग निधीतुन होत असलेल्या रस्त्याच्या बोगस व निकृष्ट कामाच्या विरोधात बिलोली तालुक्यातील तीघांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर दि.5 डिसेंबर पासुन आमरण उपोषणास प्रारंभ केला असुन सलग दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच आहे.बिलोली तालुक्यातील आदमपुर गावच्या कमानीपासुन ते पोखर्णी फाट्यापर्यंत केंद्रीय मार्ग निधीतुन रस्त्याचे काम लक्ष्मी कंसट्रक्शन कंपनी कडुन करण्यात येत आहे.वास्तविक सदर कामात अंदाजपञकाप्रमाणे न करता सुमार व निकृष्ट काम चालु आहे. कामात असलेला दोष स्पष्ट दिसत असतांना संबंधित अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करतात अत्यंत हलक्या व ढासळणा-या लाल मातीमिश्रीत मुरुमाचा वापर झाल्याची बाब हेरुन वलिओद्दीन फारुखी ,जि.एस. लंके ,मुजाहीद अली पठान यांनी दि.23 नोव्हेंबर रोजी देगलुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागास दि.5 डिसेंबर रोजी उपोषणास बसत असल्याचे लेखी निवेदन देऊनही संबंधितावर  कार्यवाही झाली नसल्याच्या विरोधात उपोषण आंदोलन सुरु केले आहे.सोबतच गुणवत्ता तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यत देयके काढु नयेत .व काम थांबवावे .गुत्तेदारांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आदि मागण्यांसह डब्लु. फारुखी , जि.एस.लंके , मुजाहीद अली पठान यांनी म्हटले आहे.