आयसिटी संगणक शिक्षकांचे १८ डिसेंबरला नागपूरात आंदोलन

0
23

नांदेड,दि.14ः- केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आय.सि.टी. योजनेतंर्गत देशातील इतर राज्याप्रमाणे महराष्ट्रातील ८ हजार संगणक शिक्षकांना कायम स्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या प्रलंबित मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 18 डिसेंबरला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघांच्या अध्यक्षांनी दिली आहे.
डिजिटल इंडियाचा बोलबाला करणा-या सरकारने विद्यार्थ्यांना मोफत संगणकाचे ज्ञान मिळवून देण्याकरीता केंद्र शासनाने आय.सि.टी.योजना पूर्ण देशभरात सुरू केली. याप्रमाणे महाराष्ट्रातही ही योजना महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक,राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियाना मार्फत २००७-०८ पासून राबविण्यात येत होती.महाराष्ट्रातील ८ हजार अनुदानीत शाळांमधे करोडो रुपये खर्च करून संगणक कक्ष उभारण्यात आले,पण या शासनाने २०१६ मध्ये ही योजना बंद करून डिजिटल इंडियाचा पाया असणाऱ्या महाराष्ट्रातील ८ हजार आय.सि.टी.संगणक शिक्षकांना घरी पाठवून दिले व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली.या उपासमारीळे महाराष्ट्रातील ३ संगणक शिक्षकांनी आत्महत्या केली.देशातील इतर राज्या प्रमाणे आयसिटी संगणक शिक्षकांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याकरिता २०१४ पासून महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या वतीने या न्याय हक्काच्या मागणी करीता ८ हजार संगणक शिक्षकांचे संघटन उभारून  वेळोवेळी गांव पातळी ते राज्य पातळीवर अनेक मोर्चे,आंदोलने,उपोषने करून निवेदने देण्यात आली.मागील ५ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर गेलेल्या संगणक शिक्षकांच्या मोर्च्यांवर पोलिसांकडून अमानुष लाठी हल्ला केला. यात २० संगणक शिक्षक जखमी झाले होते.यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा कडून अस्वासने मिळाली होती.या नंतर याच मागणी करीता २२ में २०१७ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सलग १३ दिवस बेमूदत आमरण उपोषण सुरू होते.यावेळी अनेक महिला-पुरुष संगणक शिक्षकांची तब्बेत खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळीही शिक्षण मंत्र्यांकडून फक्त पोकळ अस्वासनाची खैरातच मिळाली.पुन्हा याच प्रलंबित मागणी करीता अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे सह तिन आमदारांनी १७ जुलै २०१८ रोजी पुणे ते मुंबई अशी चालत शिक्षण बचाव पदयात्रा काढली तेव्हा संगणक शिक्षकांचे काम लवकरात लवकर होणार आहे असे वचन शिक्षण मंत्र्यांकडून मिळाले.
मागील दोन वर्षापासून ही प्रलंबित असलेली मागणी पूर्ण न झाल्याने होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर १८ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजतापासून महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या पुढाकारातून ८ हजार संगणक शिक्षक हे अमरावरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे व राज्यातील सातही शिक्षक आमदार भव्य आंदोलन करणार आहेत.यावेळी जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन माघे घेतले जाणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी दर्शवली असून महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष कॉ.शरद संसारे,उपाध्यक्ष कॉ.जिवन सुरुडे,औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष योगेश काथार, नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष गजानन देवने,उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे,तेसेच भोकर व हिमायतनगर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांसह आदींनी महाराष्ट्रातील सर्व संगणक शिक्षकांनी आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे  आवाहन केले आहे