व्याज दर ‘जैसे थे’

0
14

मुंबई, दि. ३ – गेल्या महिन्यात सर्वसामान्यांना व्याजदर कपातीची भेट देणारे रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवत सावध भूमिका घेतली आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतरच रघुराम राजन व्याजदर कपातीवर निर्णय घेतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
रिझर्व बँकेने मंगळवारी चालू आर्थिक वर्षातील शेवटचे पतधोरण जाहीर केले. रिझर्व बँकेने रेपो रेट ७.७५ टक्क्यांवर कायम ठेवले आहे. तर रोख निधी गुणोत्तरही (सीआरआर) ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. वैधानिक तरलता गुणोत्तर (एसएलआर) २२ टक्क्यांवरुन ते २१.५ टक्के ऐवढे करुन रिझर्व बँकेने बँकांना दिलासा आहे. या निर्णयामुळे बँकांच्या गंगाजळीत हजारो कोटी रुपये जमा होऊ शकतील.