सर्वशिक्षा अभियान कृती समितीची शासन सेवेत कायम करण्याची मागणी

0
14

नागपूर ,दि.19- सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत १५ वर्षांपासून महाराष्ट्रात कार्यरत असलेले  शेकडो मोर्चेकरी शासन सेवेत कायम करा या मुख्य मागणीसह सर्वशिक्षा अभियान करार  ‘कर्मचारी कृती समिती’चे कर्मचारी विधानभवनावर धडकले.एलआयसी चौकात पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडविले. मोर्चाचे नेतृत्व राज्याध्यक्ष प्रकाश आंबेकर, उपाध्यक्ष किशोर वैरागडे, सचिन बिनवडे, निरजंन ढेरे, भाऊसाहेब नेटके, परमेश्‍वर काकडे, सागर गायकवाड व उमेश भरणे यांनी केले. सर्वशिक्षा अभियानातील करार पद्धतीने काम करीत असलेले विषय साधन व्यक्‍ती समावेशित शिक्षण विशेषज्ञ, जिल्हा समन्वयक, डाटा एंट्री ऑपरेटर, फिरते विशेष शिक्षक, लेखा अभियंता, रोखपाल वाहक, परिचर असे अनेक पदावर कार्यरत कर्मचारी सेवा देत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत शासनाने कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम न करता त्यांच्यावर अन्याय केला आहे. यापूर्वीही शासनाला संघटनेने निवेदने-पत्रव्यवहार केला होता. परंतु, शासनाने आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने विधानभवनावर न्याय मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. एकत्रित मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे,  अन्यथा मोर्चा स्थळावरून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला.