एकनाथ खडसेंचं पुनर्वसन नाही: फडणवीस

0
7

नागपूर,दि.19: भूखंड घोटाळ्याच्या आरोपामुळं मंत्रिपद गमवावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ‘पुनर्वसन विस्थापितांचे केले जाते. एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते आहेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.गुजरात निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. ‘पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत. राणेंचे पुनर्वसन होणार. ते आमच्यासोबत आहेत’, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. खडसे, राणे यांचा आऊटस्पोकन स्वभाव अडसर ठरण्यापेक्षा त्यांचा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा
आहे, अशा व्यक्ती पक्षाची संपत्ती असतात, असेही फडणवीसांनी सांगितले. राणेंना आमच्या कोट्यातून घेणार, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्न नाही, अशी हमीसुद्धा फडणवीसांनी दिली.

‘गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 49.4 टक्के मते मिळाली. देशाच्या राजकारणात विधानसभेत 50 टक्के मते मिळवणारी सरकार फार कमी आहेत. त्यामुळे हा विजय अभूतपूर्व आहे’ असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस आणि भाजपमध्ये 9 टक्क्यांचा फरक आहे. मात्र भाजपला कन्व्हिंसिंग विजय मिळाला, असेही ते म्हणाले.