कंधार येथे ४५ वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा

0
19

नांदेड,दि.19ः-तालुका क्रिडा संकुल श्री शिवाजी कॉलेज नवरंगपुरा येथे दि.२० ते २३ डिसेंबर रोजी  कालावधीत  संपन्न होणाऱ्या ४५ व्या जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्याची जय्यत तयारी झाली असुन सुकाणू ,स्वागत ,मैदान ,पाणी पुरवठा ,स्टेज मंडप ,शोभायाञा ,आरोग्य यासह अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या असुन कंधार तालुक्यात संपन्न होणाऱ्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याची जय्यत झाली असल्याची माहिती जिल्हा संघटन आयुक्त स्काऊट दिगंबर करंडे व प्रसिद्धी समिती अध्यक्ष बाबुखॉ पठाण ,सचिव जमिर बेग यांनी दिली.

भारत स्काऊटस आणि गाईडस् जिल्हा कार्यालय नांदेडच्या वतीने जिल्ह्यात स्काऊट गाईड चळवळीचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने जिल्हयात प्रतिवर्षी क्रमाने एका तालुक्यात स्काऊट गाईडचा मेळावा आयोजित करण्यात येतो. कंधार येथे दि.२० डिसेंबर ते २३ डिसेंबर २०१७ या कालावधीत जिल्हातील दोन ते अडीच हजार स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत .कंधार तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक ,शिक्षिक ,पदाधिकारी यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दि.२० रोजी कंधार नगरीत आगमण होणाऱ्या स्काऊट गाईड संघासाठी नोंदणी ,तंबु उभारणे ,दि.२१ रोजी जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार ,यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.दुपारी भव्य रक्तदान शिबीर व सायंकाळी प्रथम शेकोटी कार्यक्रम उदघाटन अध्यक्ष  माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे राहणार आहेत.दि.२२ रोजी शहरातुन भव्य शोभायाञा व कब बुलबुल मेळावा उदघाटन अध्यक्ष माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे तर दि.२३ रोजी सर्वधर्मीय प्रार्थना व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस वितरण व समारोप कार्यक्रम संपन्न होणार आहे. या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणअधिकारी अधिकारी  तथा सुकाणु समिती अध्यक्ष बालाजी कपाळे ,सचिव जी.आर.पगडे ,स्वागत समितीचे  के.एम.पांडागळे ,मोतीभाऊ केंद्रे ,मैदान समिती अध्यक्ष बी.एन.राऊत ,पाणी पुरवढा समिती अध्यक्ष माधव पेटकर ,कैलास होनधरणे ,स्टेज मंडप समिती अध्यक्ष प्रा.शेट्टीवार ,हरी चिवडे ,शोभायाञा समिती अध्यक्ष जनार्धन केंद्रे ,सचिव पी.डी.संगेवार ,निवास समिती अध्यक्ष पी.डी.गायकवाड , विविध दुकान समिती अध्यक्ष सुरेश धोंडगे ,बालाजी डफडे ,भोजन समितीचे के.बी.लुंगारे ,आरोग्य व्यवस्था समिती अध्यक्ष मारोती तुपकर ,ऊध्दव केंद्रे ,सुरक्षा समिती अध्यक्ष दिलीप सावंत ,प्रसिद्धी समिती अध्यक्ष बाबुखॉ पठाण ,सचिव जमिर बेग ,प्रा.डॉ.गंगाधर तोगरे ,हाफीज घडीवाला ,महमद अनसारोद्दीन ,दिगांबर वाघमारे ,धोंडीबा बोरगावे ,प्रा.भागवत गोरे ,बा.पु.गायकर ,दिगांबर गायकवाड ,गणेश कुंटेवार ,प्रा.सुभाष वाघमारे ,प्रल्हाद आगबोटे ,रवि कांबळे ,रवि ढगे आदीसह कंधार तालुक्यातील शिक्षक प्रेमी प्ररीश्रम घेत आहेत.