पशुपालनातून आर्थिक विकास साधावा-आ.काशीवार

0
17

लाखांदूर,दि.31 : निसर्गाच्या लहरीपणामुळे हेक्टरी उत्पनात कमालीची घट आल्याने बळीराजा आर्थीक संकटात आहे. बदलत्या परिस्थितीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयानी आता अत्याधुनिक शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे लक्ष दिल्यास नक्कीच आर्थीक विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले.
लाखांदूर तालुक्यातील रोहिणी येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीच्या वतीने आयोजित तालाकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीच्या उद्घाटणीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभापती कृषी व पशु संवर्धन सभापती नरेश डहारे, पंचायत सतिमी सभापती मंगला बगमारे, न. प. उपाध्यक्ष नरेश खरकाटे, तेजराम दिवटे, ताराचंद मातेरे, जि. प. सदस्य प्रणाली ठाकरे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, नूतन कांबळे, राधेश्याम मुंगमोडे, माजी जि. प. सदस्य वामन बेदरे, हरगोविंद नखाते, न. प. सदस्य रमेश मेहेंदळे, ईश्वर घोरमोडे, विकास हटवार, पं. स. सदस्य शिवाजी देशकर, सदस्य अल्का मेश्राम, सरपंच रोहणी प्रणाली शेंडे, शेषराव हटवार, उमा वझाडे, खंडविकास अधिकारी देवरे, प्र.सहा. आयुक्त पशुसंवर्धन लाखांदूर टंडन, पशु विस्तार अधिकारी लाखांदूर आर. डी. लांजेवार, ए आर हजारे, ए एस वरखडे, आर एस मनवर, एन एस सोनकुसरे, गिहेपुंजे, कंगाले, गोस्वामी, मडावी, चामलाटे, पवार, व शेकडो गावकरी व पशुपालक उपस्थित होते.
काशीवार यांनी, शेतकºयांनी केवळ भात पिकावर अवलंबून न राहता मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आस धरल्यास शेती नक्कीच परवडेल, शेती सोबत जोडधंदा शेतकºयासाठी वरदान ठरणारा आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने शेती व पशुपालनासाठी अनेक नवनवीन योजना सुरू केल्या आहेत, या सर्व योजनांचा पुरेपूर फायदा घेतल्यास नक्कीच शेतकºयाचा आर्थीक स्तर उंचावणार असल्याचे ते बोलले.
सभापती नरेश डहारे यांनी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया सर्व योजनांचा लाभ घ्यावा. सदर पशु प्रदर्शनी मध्ये विक्रमी ४१२ जनावरांची नोंद करण्यात आली. सुदृढ व निरोगी पशूंची क्रमवारी ठरवून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक ठरवून त्यांना धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक पशु विस्तार अधिकारी लाखांदूर आर डी लांजेवार, संचालन योगेश कुटे यांनी तर आभार डॉ. सोनकुसरे यांनी मानले.