सीईओ रेखावारांची बदली, गावडे नवे सीईओ,शिंदे प्रकल्प संचालक

0
22

पालकमंत्र्याच्या जिल्ह्यात आयएएस अधिकार्यांचा यायला नकार
गोंदिया-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील 15 प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आज (शुक्रवारी) तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. महिनाभरात हा तिसरा बदल आहे. गोंदिया जिल्हा परिषदेला लाभलेले सीईओ राहुल रेखावार यांची हिंगोलीच्च्या सीईओपदी,तर ड़ी.डी.शिंदे यांची राजीव गांधी पंचायत शसक्तीकरण अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पुणे या पदावर बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.तर रेखावार यांच्या जागेवर विधानपरिषदेचे सभापती यांचे खासगी सचिव गावडे यांची बदली करण्यात आली आहे.नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे. विलास पाटील यांची फिल्मसिटीचे एम.डी म्हणून बदली करण्यात आली. पाटील यांच्या जागी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
गेल्या अडीच वषार्पासून आयएएस मुख्य कायर्कारी अधिकारी मिळत नसल्याने या जिल्हा परिषदेतील कामकाजाच्या गोंधळात भरच पडू लागली आहे.अभिषेक कृष्णा यांच्या बदलीनंतर महसुलविभागातून पदोन्नतीवर आलेले गेडाम यांच्या कायर्काळात नोकरभरतीसह लघुपाटबंधारे विभागाचे बंधारे बांधकामाचा विषय गाजलेला होता.पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील मारहाण आणि शिविगाळनंतर 2013 डिसेबर मध्ये गेडाम यांचे स्थानांतरण करण्यात आले.त्यानंतरही गोंदिया जिल्हा परिषदेला सऱळ आयएएस नसलेले बुलडाणा येथून आलेले डी.डी.शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.शिंदे यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातपयर्ंत काम केले.त्याच्या जागेवर सरळ आयएएस असलेले राहुल रेखावार यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी रजेवर असतानाही गोंदियात येऊन पदभार स्विकारला आणि लगेच त्याचदिवशी अतिरिक्त मुख्य कायर्कारी अधिकारी जयंवंत पाडवी यांच्याकडे प्रभार सोपवून रवाना झाले.तर ते परत न येण्यासाठीच असे ठरले.रेखावार यांच्या बदलीचे आज 6 तारखेला पुन्हा आदेश निघाले असून रेखावार यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली.रेखावार हे नांदेडचे असल्याने त्यांनी हिंगाेलीसाठी प्रयत्न चालविले असावेत.परंतु त्याच्या जागी येणारे डी.बी.गावडे हे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सभापतीचे खासगी सचिव असून त्यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून बदली करण्यात आली आहे.
शिंदे यांच्या काळाता घाटकुरोडा सारखे डोंगाप्रकरण जिल्ह्यात घडले.न्यायालयाने अनेक निणर्य दिले परंतु त्यांची अमलबजावणी त्यांच्या काळात होऊ शकली नाही.प्रशासन पुणर्त संथगतीने चालले होते अशास्थितीत जिल्हा परिषदेला खमक्या आणि सरळ आयएएस दजार्चा अधिकारी मिळाल्यास सुधारणा होऊ शकते अशी बहुंताश नागरिकांचीच नव्हे तर अधिकारी,कमर्चारी यांची इच्छा होती.परंतु रेखावार यांनी गोंदियातून बदली करवून घेतल्याने या जिल्ह्यात तरुण आयएएस दजार्चे अधिकारी यायला तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यातच या जिल्ह्याला पहिल्यांदा जिल्ह्यातीलच पालकमंत्री मिळाले परंतु त्यांच्या जिल्ह्याला चांगले अधिकारी न मिळणे यात त्यांचा सुध्दा प्रशासनात काही जम बसलेला नाही की त्यांची शासन दरबारी दखल घेतली जात नसावी असेच दिसून येत आहे.

या‍शिवाय अरविंद कुमार यांची मुंबई एमआयडीसीच्या आयुक्तपदी, महाराष्‍ट्र डेव्हलपमेंड बोर्डाचे सचिव पी.के.व्यास यांची राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी, सीमा व्यास यांची हाफकिन, बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे मुख्य संचालक पी.एन. भापकर यांची शिक्षण आयुक्तपदी (पुणे), मानवाधिकार आयोगाचे सचिव एस.पी.कडू पाटील यांची आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (पुणे), ठाणे जिल्हापरिषदेचे सीईओ एस.एन.गायकवाड यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी, उदय चौधरी यांची गायकवाड यांच्या जागी नियुक्ती करण्‍यात आली आहे. जव्हार येथील उपायुक्त सुशील खोडवेकर यांची नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदी, गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल रेखावार यांची हिंगोली जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, डी.एम. मुगलीकर यांची विक्रीकर कार्यालय, औरंगाबाद येथे सहआयुक्तपदी, डी.बी.गावडे यांची गोंदिया जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, अभय यावलकर यांची विक्रीकर कार्यालय, मुंबई येथे सहआयुक्तपदी तर मिलिंद गावडे यांची अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्‍यात आली आहे.