बासर येथे आर्य वैश्य समाजाचा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन

0
22

नांदेड,दि.3(नरेश तुप्टेवार)- भास्कराचार्य संस्थान बासर च्या वतीने आयोजित आर्य वैश्य समाजाचा वधूवर परिचय मेळावा दिनांक 3 व 4 मार्च रोजी भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी समाज बांधव आणि  विविध समितीचे प्रमुख कामाला लागले आहेत.शिवाय याच मेळाव्यात सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती महाराष्ट्र पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा मेळावा प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र,आंध्र प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या बासर येथे आर्य वैश्य समाजाचा वधू वर परिचय मेळावा होत आहे. यशस्वीतेसाठी मेळावा मार्गदर्शक एकनाथराव मामडे,मेळावा प्रमुख राजेश्वर उतरवार,उपप्रमुख रमेश माशेटीवार,राम बच्चुवार,जी.एल.निलावार,शशिकांत कोटलवार,औदुंबर बट्टेवार,उतम चक्रवार,संजय रूद्रवार,विजय कुंचनवार,संजय नळदकर,बालाजी रहाटकर,सुरेश येरावार,उल्हास महाजन,लक्ष्मण रेवणवार,राहूल अमिलकंठवार,दिंगाबर लापशेटवार,प्रमोद कटकमवार,ज्ञानेश्वर पईतवार,उदय पातावार,दताञय चंबलवार,प्रज्वल कांडलकर,शैलेश राॅकावार,डाॅ. गणेश कोकडवार,महिपाल मुतेपवार,नरेश रायेवार,अतूल चालीकवार,विठ्ठल पाटील चिद्रावार,नरेंद्र येरावार,शाम उतरवार,सुनिल गुजलवार,नारायण पांपटवार,शीतल येरावार,पवन गादेवार,प्रशांत गंजेवार,संदिप गादेवार,साईनाथ कामीनवार,संजय वटमवार,सुनिल काटमपले,गंगाधर शकरवार,किशोर पबितवार,दिपक मामडे,राहूल रेवनवार,गजानन बंडेवार,बालाजी पेडगूलवार,गोपीनाथ लापशेटवार,महेश शकरवार,स्वप्नील शकरवार,सुनील बेजगमवार,दताञय बंडावार,सुयेश पोकलवार,महेश नारलावार,सतीश पतेवार,गजानन चिद्रेवार,आदी समितीच्या प्रमुखासह समाज बांधव प्रयत्न करित आहेत.वधूवर परिचय मेळाव्यासह लग्न कार्यातील अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा स्वताच्या संसारास वापरता यावा या दृष्टिकोनातून कुलगुरू भास्कराचार्य संस्थानाच्या वतीने याच मेळाव्यात सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.जवळपास पंचवीस हजार समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच निमित्ताने नरसी येथे झालेल्या समिती प्रमुखांच्या बैठकीत मेळावा यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला. मेळावा प्रमुख राजेश्वर उतरवार आणि जेष्ठ मार्गदर्शक एकनाथराव मामडे यांनी बासर येथील भास्कराचार्य महाराज यांच्या स्थळास गुरुकुल करण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान जिल्ह्यात समाज बांधव दौरा करित असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.