अश्लील व्यवहार करणाºया उपसरपंचाला अटक करा

0
8
भोई, ढिवर, कहार, मासेमारी समितीचे जिल्हाधिकाºयांना निवेदन
गुन्हा दाखल अटक केव्हा?
आंदोलनाचा इशार
गोंदिया दि.३:: तालुक्यातील भानपूर येथील ग्रामपंचायत उपसरपंच छगनलाल गेंदलाल चौरीवार (४०) यांनी गावातीलच एका ढिवर जातीच्या महिलेशी अश्लील व्यवहार केला होता. त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र,आरोपीला अटक करण्यात आली. तेव्हा भोई,ढिवर,कहार व मासेमारी समितीव्दारे जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली.
भानपूर येथील उपसरपंच छगनलाल चौरीवार हे ढिवर समाजातील महिलेशी अश्लिल व्यवहार करीता होता. याबाबत वारंवार ताकीद देवूनही व विरोध करूनही  तो शांत न राहता अधिकच अश्लील व्यवहार करत होता. शेवटी महिलेला दुसरा पर्याय नसल्याने कौटुंबिक परिस्थिती पती, मुले, परिवार, समाज व गाव स्तरावर अशा वागणुकीमुळे लज्जास्पद व कुंठीत जीवन होत असल्याने शेवटी सर्व साधारण ढिवर जातीच्या महिलेनी गावातील उपसरपंच शाळा सुधार समिती अध्यक्ष, सहयोग बचत बँकेचे जमाकर्ता छगनलाल चौरीवार यांचेविरुद्ध गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रर केली. याची सहानिशा केल्यानंतर २४ जानेवारी रोजी त्याचेवर ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु महिलेला धमकावणे सुरूच असल्याने या प्रकरणाची माहिती भोई, ढिवर, कहार, तत्सम मासेरी समितीचे पदाधिकाºयांनी भेट घेवून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी व घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, उपसरपंच पदावरून हटविण्यात यावे.  यावे, शाळा सुधार समितीच्या अध्यक्षपदावरून बरखास्त करण्यात यावे, सहयोग बचत बँकेने ताकीद द्यावी इ. मागण्याचे निवेदन १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांना प्रतिनिधी मंडळाद्वारे  सादर करण्यात आले. प्रतिनिधी मंडळात जयेंद्र बागडे, जयचंद नगरे, सुखलाल उके, जनवादी महिला समितीचे अध्यक्ष चंद्रकला कुत्राहे यांचा समावेश होता. आरोपीला अटक करण्यात आली नाही तर, तीव्र आंदोलनाचाही इशार देण्यात आला आहे.