शरद यादवांनी तुरुंगात घेतली लालुंची भेट

0
9

रांची(वृत्तसंस्था),दि.05 – जनता दल युनायटेड (जेडीयू) मधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी सोमवारी बिरसा मुंडा जेलमध्ये लालू यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम) चे प्रमुख बाबुलाल मरांडीही होते. दोघांनी तुरुंगात अशलेल्या लालुंची विचारपूस केली.

शरद यादव म्हणाले, भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांना एकवटवण्यासाठी ते देशभरात यात्रा काढत आहेत. लालू यादव यांच्याशी चर्चेशिवाय त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते हेमंत सोरेन यांच्याशीही पोनवर चर्चा केली. असे समजले जात आहे की, लालू तुरुंगात गेल्यानंतर आता बिहार-झारखंडमध्ये एखादे नवे सत्तासमीकरण समोर येऊ शकते.