गुणवंतांचा होणार स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदकाने सत्कार

0
34

गोंदिया,दि.06ःः-शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंतीचे औचित्य साधून ९ फेब्रुवारी रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी व पदवीधर परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदकाने सत्कार करण्यात येणार आहे.
समारोहाचे उद््घाटन उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल. यावेळी राज्यसभेचे सदस्य नरेश अग्रवाल, प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन, प्रख्यात गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, माजी मंत्री अनिल देशमुख प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.
यावेळी गोंदिया जिल्ह्यात इयत्ता गुणवंत ठरलेली गुजराती नॅशनल शाळेची सिया धनेंद्र ठाकूर, सौंदड येथील आर.जे.लोहिया शाळेचा ओंकार केशव चोपकर, शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची रिचा अनिल बिसेन, आमगावच्या आदर्श विद्यालयाची वैष्णवी अशोक शेंडे, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयाची दिशा संतोष अग्रवाल, एनएमडी महाविद्यालयाची दिपा गणेश पंजवानी, डी.बी.सायन्स महाविद्यालयाची तोशाली हुलकराम भोयर, एमआयईटीची नुपूर चंद्रकांत खंडेलवाल यांचा सुवर्णपदक देवून सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच भंडारा जिल्ह्यात एनपीके विद्यालयाची पुनम प्रमोद रोहणकर, लालबहादू शास्त्री विद्यालयाची ओजल धमेंद्र उरकुडकर, जे.एम.पटेल महाविद्यालयाची मोनिका नरेंद्र नखाते, हर्षा गोपाल बलवानी, नुतन वसंता मनगटे, एमआयईटीची अश्‍विनी दिनदयाल रोकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देवून सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच कृषी व समाजकार्य क्षेत्रातउत्कृष्ट कार्य करणार्‍या दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी एकव्यक्तींचा स्मृतिचिन्ह व स्मृतीपदक देवून सत्कार करण्यात येणार आहे.
या सुवर्णपदक वितरण समारोहाला नागरिकांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुजराती राष्ट्रीय केलवानी मंडळ, स्व. मनोहरभाई पटेल स्मृती समितीचे अध्यक्ष माजी आ. हरीहरभाई पटेल तसेच मनोहरभाई पटेल अकादमी व शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले आहे.