मुख्यमंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0
8

देवरी पोलिस ठाण्यात माजी खासदार नाना पटोलेंची तक्रार
गोंदिया,दि.२२- देवरी तालुक्यातील पिंडकेपार येथील शेतकNयाने कर्जापायी केलेल्या आत्महत्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच जबाबदार असल्याने त्यांच्यविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या आशयाची तक्रार माजी खासदार नाना पटोले यांनी आज आज २२ पेâब्रुवारी रोजी देवरी पोलिस ठाण्यात लिखीत स्वरूपात दिली.
सविस्तर असे की, पिंडकेपार येथील माधोराव आत्माराम गजभिये वय ५४ वर्ष यांनी कर्जाची परतपेâड न करू शकल्याने नैराश्येच्या भावनेतून किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. एकीकडे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गोंदिया जिल्हयाच्या दौNयाप्रसंगी गोंदिया जिल्हयात शेतकरी आत्महत्या करीत नाही. असे आपल्या संबोधनात म्हणतात आणि दुसNयाचदिवशी गोंदिया जिल्हयातील देवरी तालुक्यात कर्जापायी शेतकरी आत्महत्या करीत असल्याने या प्रकाराला मुख्यमंत्रीच दोषी असल्याने त्यांच्यविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावे. अशी मागणी खा. पटोले यांनी देवरी ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीतून केली आहे. दरम्यान देवरी पोलिसांनी हे तक्रार चौकशी साठी वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.