परिसरातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी कटीबद्ध

0
15
गोपालदास अग्रवाल यांचे प्रतिपादन,मरारटोला येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन
गोंदिया- परिसरातील जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळावी, याकरीता आम्ही गोंदियात शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाची स्थापना केली. आता लवकरच वैद्यकिय महाविद्यालयाच्या आधारभूत ढाच्याच्या निर्मितीनंतर सर्व रोगांवर उपचार होवून विद्याथ्र्यांना शिक्षणासोबतच कोणत्याही आजारी व्यक्तीला उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. आम्ही नेहमीच जनतेला योग्य आरोग्यसेवा मिळावी, याकरीता कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ते मरारटोला येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई मडावी, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,पं.स.सभापती माधुरीताई हरिणखेडे,महिला व बालकल्याण सभापती लताताई दोनोडे,कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजाताई सोनवाने, पं.स.उपसभापती चमन बिसेन,जि.प.सदस्य डुलेश्वरीताई लिल्हारे, जि.प.सदस्य भोजराज चुलपार,उपसरपंच जिताराई पंढरे,विमल नागपूरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम,प्रमिला करचाल,निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट,प्रिया मेश्राम,इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, ़जयप्रकाश बिसेन,हरीचंद कावळे, बंटी भेलावे,जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी.निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, वैद्यकिय अधिकारी
ड़ॉ.आशिष नेवारे व अन्य उपस्थित होते. पूढे बोलताना अग्रवाल म्हणाले,शहरातील केटीएस सामान्य रूग्णालय व बाई गंंगाबाई स्त्री रूग्णालयात ग्रामिण भागातीलस  नागरिक उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यांना योग्य आरोग्यसेवा मिळण्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही रूग्णालयात खाटांची क्षमता वाढविण्यात आली असून जर्जर इमारतींच्याठिकाणी भव्य इमारतींचा निर्माण करण्यात आले आहे. प्रगतीशील शासनाचे सर्वात आधी नागरिकांना योग्य आरोग्यसेवा देण्याचे कर्तव्य असून आरोग्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.