भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार

0
8
देवरी,दि. २६ :  : भरधाव वाहनाने मोटारसायकलस्वारास धडक दिल्यानंतर रस्त्याच्याबाजूला उभा असलेल्या इसमास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच शिरपूर येथे घडली. गाडी क्रमांक एम.एच. ३४/एए – ८८१८ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकल चालकास धडक मारून गंभीर जखमी होण्यास व रस्त्याच्या बाजूला उभे असलेले प्रभुदास सुदाम कोटांगले रा. शिरपूर यास गंभीर जखमी करून मरणास कारणीभूत झाले. फिर्यादी युवराज गणेश मेश्राम यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.