अंगणवाडी सेविकांची सेवासमाप्ती ६०व्या वर्षी,13 हजार सेविकांना फटका

0
13

गोंदिया दि. २८:: अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश २३ फेब्रुवारीस महिला व बालविकास विभागाने काढला असून, त्याविरोधात अंगणवाडी तार्इंतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. नव्या आदेशामुळे राज्यातील सुमारे १३ हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाºयांना १ एप्रिलपासून घरी जावे लागणार आहे.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनामध्ये दरवर्षी वेतनवाढीप्रमाणे वाढ करण्याची शासनास शिफारस करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सेविकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असलेली समिती २० जुलै २०१६च्या निर्णयान्वये स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने ९ मार्च २०१७ रोजी अहवाल दिला. त्यात सेवासमाप्तीचे वय कमी करण्याची शिफारस केली. त्यानुसार वय कमी केल्याचे शासनाचे म्हणणे आहे. राज्य शासनाने आमच्यात मानधनात वाढ केली आणि सेविकांची नोकरीही काढून घेतली. याविरोधात आम्ही पुन्हा आंदोलनाची हाक देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे नेते काॅ.हौसलाल रहागंडाले यांनी सांगितले आहे.