मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जुनी पेन्शन हक्क संघटेनेचे राज्यधिवेशन-खांडेकर

0
17

जालना,दि.28ः-महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्यातील सर्व डीसीपीएस धारकांचे जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी राज्यस्तरीय महाअधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच आयोजित करण्यात येईल अशी घोषणा संघटनचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी केली.ते जालना येथे संघटनच्या राज्य बैठकीत बोलत होते. खांडेकर पुढे म्हणाले की, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर राज्यातील पन्नास हजारापेक्षा अधिक डीसीपीएस धारकांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मुंडन मोर्चा काढला होता. त्यावेळी संघटनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून १ नोव्हे. २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी शासनाने तात्काळ १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली होती. तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटूंब निवृत्ती वेतन व उपदान दयावे अशी मागणी केलेली होती. त्यावर मुख्यमंत्र्यानी फॅमिली पेन्शन संदर्भात सकारात्मक विचार शासन करेन असा शब्द दिला होता. मात्र त्यावर अजुनही कार्यवाही होत नसल्याने पुन्हा एकदा राज्यभरातील हजारो लाखो डीसीपीएसधारकांचा आक्रोश महाअधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांना शक्ती दाखवुन देण्यात येईल व शासनाकडून जुनी पेन्शनची मागणी मान्य करून घेण्यात येईल असे वितेश खांडेकर यांनी म्हटले आहे.
३० एप्रिलला दिल्ली येथील जतंर मंतर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पेंशन बहाली अभियानतंर्गत जुन्या पेंशनसाठी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी राज्य सरचिटणीस गोविंद उगले यांनी अधिवेशन व आंदोलनाविषयी मार्गदर्शन केले.तर राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी संदीप सोमवंशी गोंदिया यांची निवड करण्यात आली.
संदीप सोमवंशी यांची राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल राज्यध्यक्ष वितेश खांडेकर, गोंदिया जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके,सचिव सचिन राठोड,राज कडव,प्रवीण सरगर,मुकेश रहांगडाले,सदाशिव पाटील,महेंद्र चौहान,सचिन धोपेकर,सुभाष सोनवणे,सुनील राठोड,संतोष रहांगडाले,भूषण लोहारे,जीवन महाशास्खेत्री ,शितल कनपटे ,आदींनी अभिनंदन केले.