बीएएमएस विद्यार्थ्याला रॅगिंग करून पाजले मूत्र

0
9

नागपूर,दि.१- शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका बीएएमएसच्या विद्यार्थ्याला रॅगिंगच्या नावाखाली लघवीण्मिश्रीत फिनाइल पाजल्याची घटना नागपूर येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विष्णू भारत पवार (२१, सेलू, जि. परभणी) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. हनुमाननगर येथील श्री आयुर्वेद कॉलेजमध्ये िवष्णू बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या वसतिगृहात तो राहतो. त्याच्या खोलीत इतर तीन विद्यार्थी राहतात. २१ फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थ्याचा त्याला फोन आला आणि वसतिगृहात येण्यास सांगितले. विष्णू रात्री १०.३० च्या सुमारास श्रीनाथ नावाच्या मित्रासह वसतिगृहात गेला. त्यावेळी त्याला एका खोलीत वरिष्ठ विद्यार्थी रॅगिंग घेत असल्याचे समजले. रॅगिंगच्या भीतीपोटी विष्णू वसतिगृहाच्या बाहेरच फिरत होता. मध्यरात्री तो खोलीत उपाशीपोटी जाऊन झोपला. विष्णू वसतिगृहात आल्याची माहिती विद्यार्थ्यांना समजली. त्यानंतर राहुल नावाच्या विद्यार्थ्याने त्याला उठवत खोलीत नेेले. त्यावेळी तिथे रंजित सरदार, प्रशील उचके, प्रवीण गेडाम, शुभम मडावी, राजू सलामे, देवेंद्र मडावी, तुकाराम बुरकुले यांच्यासह १२ ते १५ विद्यार्थी होते.
विष्णूला पाहताच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. “मी उपाशी आहे. मला मारू नका’ अशी विनवणी विष्णू करत होता. त्यानंतर त्याच्या अंगावर सर्व विद्यार्थ्यांनी लघवी केली आणि नंतर त्याला फिनाइल मिश्रीत मूत्र पाजले. एवढ्यावर समाधान न झाल्याने त्याला विषारी औषध देखील पाजले.