५ मार्चला कुंभार समाज धडकणार विधानभवनावर

0
15

चंद्रपूर,दि.01ः- कुंभार समाजाच्या ज्‍जवलंत विविध प्रलंबित समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ मार्च २0१८ रोजी सकाळी १0 वाजता राज्यातील कुंभार समाजाच्यावतीने कुटूंबासह मुबंईत विधानभवनावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एन.टी.प्रवर्गात समावेश करावा, कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे. मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करण्यात यावी, माती वाहतूक व विटाभट्टी परवान्याच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आणि कुंभार समाजास ओळखपत्रावर परवाना देण्यात यावा.
समाजाला जळावू लाकडे ३00 रुपयांप्रमाणे देण्यात यावे. या समाजाला आपल्या मालाच्या उत्पादनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, कुंभार समाजातील विद्यार्थ्यास जिल्हास्तरावर स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी आदी मागण्यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील हजारो समाज बांधव या मोर्चात सहभागी होत असून या आरपारची लढाईत हजारो संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुंभार समाज महासंघ चिमूरचे तालुका अध्यक्ष गणपत खोबरे ,शहर शाखा प्रमुख अनिल कपाटे ,सूरज खांदरे ,दशरथ खोबरे, गणेश गिरोले, मनोज खोबरे , अरविद कपाटे , वैभव खोबरे , सोनू खोबरे ,भगवान बोरसरे , नामदेव खोबरे , सुग्रेश खोबरे,रमेश खोबरे ,परशराम कपाटे ,विठ्ठल खोबरे , राजेश्‍वर गिरोले ,रमेश गिरोले ,तुकाराम बोरसरे,राहुल खोबरे आदींनी केले आहे.