कारंजा येथील सी. बी. अ‍ॅग्रोटेकला आग

0
9

वाशिम,दि.03 : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अ‍ॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथील चंदनवाडी परीसरात बरडिया यांच्या  मालकीच्या सी.बी. अ‍ॅग्रोटेकमध्ये कापसाची खरेदी केल्या जाते. दरम्यान, खरेदी केलेला कापूस ज्याठिकाणी साठवून ठेवला होता, तेथे शनिवारी दुपारी अचानक आग लागली. त्यात साधारणत: साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. बाजारभावाप्रमाणे अंदाजे दीड ते दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.