राजकारण विरहीत आरोग्य सेवा देण्यावर भर-आरोग्यमंत्री डॉ.सावंत

0
11

राज्यातील पहिल्या माॅडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

जिल्हापरिषद अध्यक्षासह आरोग्य सभापतींनी फिरवली पाठ

गोंदिया,दि.०३ः– आरोग्य सेवा देतांना कुठल्याही राजकारणाचा गंध नसावा तर राजकारण विरहित आरोग्य सेवा जनतेपर्यंत कशी पोचविता येईल यासाठीच सर्वपक्षिय नेत्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.आज आम्ही सत्तेत आहोत तर काँग्रेसराष्ट्रवादी विरोधात आहे.परंतु जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा आम्ही विरोधात असतानाही आरोग्यासह इतर प्रश्नावर मात्र मिळूनच निर्णय घेतला आहे.त्याचप्रकारे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्यसेवा ही जनसेवा असल्याचे ब्रीद ध्यानात ठेवून कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी केले.ते सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.राज्यातील पहिलेच नव्या पध्दतीने तयार झालेले हे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रातून चांगली सेवा जनतेला द्यावे.शासनस्तरावर उभारण्यात आलेली वास्तू ही आरोग्य केंद्राची वास्तू खासगी रुग्णालयालाच्या वास्तूलाही लाजवेल अशी सुसज्ज असून कर्मचारी अधिकारी यांचे निवासस्थानही त्याचपध्दतीने उभारण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते.तत्पुर्वी सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथील आरोग्य उपकेंद्राचेही उदघाटन डॉ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल,जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,रमेश चुर्हे,शिला चव्हाण,माधुरी पाथोडे,माजी उपाध्यक्ष रचना गहाणे,अविनाश काशिवार,अर्जुनी मोरचे सभापती अरविंद शिवणकर, खोडशिवनी सरपंच उर्मिला कंगाले,कविता रंगारी,पोलीस पाटील भृग़राज परशुरामकर, सीईओ एम राजा दयानिधी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शाम निमगडे,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.देवेंद्र पातुरकर,जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे,पंचायत समिती सभापती गिरधारी हत्तमारे,उपसभापती राजेश कठाणे, पंचायत समिती सदस्य इंदुताई परशुरामकर उपअभियंता सुनिल तरोणे,उपसरपंच टेकराम परशुरामकर व तालुका वैद्यकिय अधिकारी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.या नव्या स्वरुपात तयार करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीला बघण्यासाठी आजूबाजुच्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती.या माॅडेलनुसारच पुढे नव्या आरोग्य केंद्राच्या इमारती तयार करण्याचा मनोदय यावेळी मंत्रीमहोदयांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना डॉ.सावंत म्हणाले की,शासनाच्या ध्येयधोरणानुसारच नव्या आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना मंजुरी दिली जाते.कुठल्याही राजकीय दबावात ग्रामीण रुग्णालय qकवा आरोग्य केंद्र निर्माण होत नसून त्यासाठीचे निकष महत्वाचे आहेत.गोंदिया जिल्ह्यात मंजुर झालेल्या सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी माझी वाट न बघता पालकमंत्री यांच्या हस्ते करुन घ्यावे असे सांगत सौंदड ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या ६ महिन्याच्या आत सोडवून त्या रुग्णालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाला त्यावेळी नक्की येणार असे सांगितले.गोंदिया जिल्ह्यात ८६ टक्के पदे भरली असून उर्वरित रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.यावेळी बोलतांना क्रार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की ही ईमारत राज्यातील पहिलीच वेगळ्या पध्दतीने तयार झालेली ईमारत असून या आरोग्य केंद्राच्या मंजूरीसाठी प्रफुल पटेलांपासून तर आपण सर्वांनीच विशेष प्रयत्न केले आहेत.आपल्या ८ वर्षाच्या कार्यकाळात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी भरघोष प्रयतन् केले आहे.आरोग्य केंद्र सेवा देण्यासाठी असल्याने आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाèयांनी अरेरावीपणा थांबवत समाजसेवेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी केली.यावेळी इमारत तयार करणारे कंत्राटदार विष्णु अग्रवाल व उपअभियंता सुनिल तरोणे यांचा मंत्रीमहोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,रमेश चुर्हे यानीही विचार व्यक्त केले.प्रास्तविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले.