आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार

0
28

मुंबई,दि.06 आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरु केला जाणार आहे. 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी तुरुंगवास सोसला, अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे.1975 ते 1977 या काळात संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी आणीबाणीविरोधात संघर्ष करताना, कोणी एक महिना, कोणी तीन महिने, तर कोणी 19 महिने जेलमध्ये होते.

महाराष्ट्र वगळात इतर काही राज्यांमध्ये आणीबाणीत लढलेल्या व्यक्तींना 5 ते 10 वर्षांपूर्वीच अशा प्रकारची पेन्शन सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही अशी पेन्शन योजना सुरु व्हावी अशी बऱ्याच काळापासून मागणी होती. त्यानुसार मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत करण्यात आली होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते.