मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

सेवेच्या निकषात चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र मॉडेल

गोरेगाव,दि.07 : वैद्यकीय सेवेचे तीन-तेरा हा प्रकार अनेकदा ऐकावयास येतो. परंतु, काही संस्थेतील सेवा आणि सेवाभावी कर्मचारी, अधिकाèयांमुळे त्या संस्था सेवेसाठी आदर्श ठरतात. याची परिचिती गोरेगाव तालुक्यातील चोपा प्राथमिक आरोग्य केंद्राने करून दिली आहे. यामुळे वैद्यकीय सेवेच्या सर्व निकषांत उत्तीर्ण ठरत असलेले चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यासाठी एक मॉडेल म्हणून नावारुपासही येऊ लागले आहे.एकंदरीत हे केंद्र आता जिल्ह्यात आदर्श केंद्र म्हणून नावारुपास आले आहे. विशेष म्हणजे, या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.राध्येशाम पाचे व डॉ. कु. सोनकनवरे कार्यरत आहे. हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी रुग्णांची विशेष दखल घेत आहे. यामुळे देखील आरोग्य सेवेसाठी सर्वोत्तम संस्था म्हणून परिसरातील नागरिकांकरिता ठरू लागली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिकस्तरावर प्राथमिक उपचार उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यातच शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या भौतिक सोयीसुविधा सबळ करण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेतले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांचा सहभागही लाभावा, यासाठी कायापालट यासारखी योजनाही नुकतीच राबविण्यात आली. या सर्व बाबींमध्ये कायाकल्प करून चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र आता जिल्ह्यासाठी मॉडेल स्वरुपात समोर येऊ लागले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा येथे प्रशस्त इमारत आहे. इमारतीपुढे छोटेसे गार्डन आहे. या संस्थेची सेवा सर्व रुग्णांना उपलब्ध व्हावी यासाठी टोकन पद्धत नव्याने सुरू करण्यात आली आहे. ही पद्धत शासकीय रुग्णसंस्थांमध्ये प्रथमत:च प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा येथे सुरू झाली आहे. नोंदणी केलेल्या रुग्णांना टोकन सिस्टमची मशिनच वैद्यकीय अधिकाèयांच्या कक्षात आमंत्रित करीत असते. त्यामुळे रुग्णांची कसलीही गैरसोय होत नाही. शिवाय येथील शस्त्रक्रिया कक्ष, स्वतंत्र पुरुष आंतररुग्ण सेवा कक्ष, स्वतंत्र महिला आंतररुग्ण सेवा कक्ष, हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहे.
एका मोठ्या रुग्णालयासारखे या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सेवा उपलब्ध होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील भांडार कक्षात अत्यंत सुलभ व सोयीच्या पद्धतीने औषधींची मांडणी करण्यात आली आहे. रुग्णांसाठी वाचन कोपरा, मनोरंजनासाठी आंतररुग्ण सेवा व बाह्यरुग्ण सेवा कक्षात टिव्हीदेखील आहे. चिमुकल्या रुग्णांकरिता विशेष दक्षता कक्ष तयार करण्यात आले आहे. याशिवाय रुग्णालयाच्या बाहेर परिसरातही सर्व वैद्यकीय सेवेतील टाकाऊ पदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सोय करण्यात आली आहे.

 

Share